व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर 7 मार्च पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका समोर कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी ठिय्या मांडला असून महानगरपालिकेसमोर त्यांनी त्यांचा मुक्काम ठोकला आहे.
रात्रभर महापालिकेसमोर रस्त्यावर झोपून महिलांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेमध्ये सोळाशे महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई झाडलोट आदी प्रकारचे कामे करत आहेत. गेल्या वीस वर्षापासून या महिला काम करत आहेत, पूर्वी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जात होते परंतु स्वयंरोजगार सहकारी संस्थांनी महिलांच्या प्र फंड मध्ये घोटाळा करून त्यांचा प्र फंड खाल्ल्या व त्यांना किमान वेतन दिले नाही यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अ ,ब ,क, ड, ह, ग ,फ ,ई प्रभाग प्रमाणे निविदा काढून मोठ्या ठेकेदारांना ही काम देण्यात आली.परंतु मोठ्या ठेकेदाराने देखील महिलांना किमान वेतन समान वेतन न देता त्यांना अत्यंत तुटपुंज्या पगारावर ते राबवून घेतले गेल्या चार वर्षापासून हा अन्याय सुरूच आहे.
Discussion about this post