व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –दिवाळी म्हटलं की घराची साफ-सफाई, सजावट, खरेदी अशा बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात.
त्याच गोष्टी एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी आकुर्डी विवेकनगर येथील जानकीदेवी समाज सेवा क्रेंद येथे आयोजित दिवाळीच्या मनमुराद खरेदीची सुवर्णसंधी विविध वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री (दि. (१४ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ सकाळी १०.३० ते ८.३० वाजेपर्यंत करण्यात आले.
हस्तकला, डिझायनर साड्या व ड्रेसेस, ज्वेलरी, पर्सेस व बॅग्स, फ्रेम्स, स्वेटर्स दिवाळीच्या विविध वस्तु, आकाशकंदील व दिवे, घर सजावटीचे सामान, विविध भेटवस्तु, मसाले, दिवाळीचे खाद्यपदार्थ इ.
खरेदीबरोबर वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थाचा आस्वाद
खरेदी करणाऱ्यासाठी रोज लकी ड्रॉ
खरेदीबरोबरच येथे फूड स्टॉल असून विविध पदार्थ येथे खवय्यांना खाता येणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यांवी असे आवाहन सखी दिवाळी फेअरचे वतिने केले आहे.
स्थळ : समाज सेवा केंद्र
आकुर्डी पोस्ट ऑफिसजवळ, विवेकनगर, आकुर्डी, पुणे – ३५.
Discussion about this post