व्हीएसआरएस मराठी न्युज आळंदी : येथील केळगाव ( ता.खेड ) मध्ये भारतीय खेळ प्राधिकरणाच्या मान्यतेने जोग महाराज व्यायाम शाळेत राजस्तरीय क्रीडा शिबिर उत्साहात झाले. संपूर्ण राज्यातून १६० खेळाडू आर्चरी, स्विमिंग,कुस्ती, जिम्नॅस्टिक या खेळाचे प्रशिक्षण या शिबिरात खेळाडू घेत आहे.
यासाठी आंतर राष्ट्रीय कुस्ती पंच व शिव छत्रपती पुरस्कार सन्मानित दिनेश गुंड यांचे मार्गदर्शन मिळत आहे. खेळाडू सराव करत असून दर आठवड्याला वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुलांना पदक वितरित करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. याच ठिकाणी इयता १० वी पर्यंत शालेय शिक्षणासाहित अत्याधुनिक स्पोर्ट्स स्कूल सुरू कार्नाय्त आले आहे.
खेळ, शिक्षण, स्टडी सर्कल या माध्यमातून आजपर्यंत २०० हुन अधिक राष्ट्रीय पदक विजेते ,१५ आंतरराष्ट्रीय खेळाडू , तसेच पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक अनेक क्षेत्रात व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असल्याचे प्रा.पै. दिनेश गुंड यांनी सांगितले.
Discussion about this post