व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-महावितरणाच्या भोसरी विभागातील तळवडे गावठाण, जोतिबानगर, चिखली, मोरेवस्ती, नेवाळेवस्ती, साने चौक, शरदनगर, दुर्गानगर, त्रिवेणीनगर, टॉवर लाईन, विठ्ठलवाडी, फुलेनगर, पाटीलनगर या भागात मुख्य वीजवाहिनीवर आकडे टाकून बीजचोरी केली जात आहे.
त्यात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सामील असून, प्रत्येक अनधिकृत वीजजोडसाठी महिना ३०० रुपये भाडे वसूल केले जाते, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. प्रामाणिकपणे दरमहा बिल भरून शहरातील लाखो नागरिक वीज वापरतात. त्यांचा एका महिन्याचे बिल जरी थकीत राहिले तर, थेट वीज खंडीत करून मीटर काढून नेला जातो.
मीटर जोडणीसाठी २०० रुपये दंड आकारला जातो. मात्र, वरील भागात सर्रासपणे आकडे टाकून चोरून वीज वापरली जात आहे. त्या प्रकाराकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप काळभोर यांनी केला आहे. ही वीजचोरी रोखावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Discussion about this post