व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्वच प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या.
कपडा मार्केट, किराणा, इलेक्ट्रिक आणि इलेक्र्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि सराफ मार्केट बंद असल्याने किमान 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.
सकाळपासूनच बंदला उत्फूर्त प्रतिसाद
शनिवारी सकाळपासूनच बंदला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे, मेन बाजार पिंपरी या मार्गाने मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे दाखल झाला. या दरम्यानसकाळी सात ते सायंकाळ प्रयत्न सर्व प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. यामध्ये निगडी, थरमॅक्स चौक, भोसरी, मोशी, वाकड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, रावेत येथे शुकशुकाट होता.
शहरात सर्व भागांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि आस्थापना बंद ठेऊन बंदला प्रतिसाद दिला.
Discussion about this post