Nagar : नगर : अहमदनगर दौंड मार्गावर दौंडनजिक रविवारी सकाळी ११ च्या सुमारास एका कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. आठजण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी निघाले होते.
शाहबाज शेख, गाझी बांगी आणि लुझैन शेख अशी मृतांची नावे आहेत.मृत आणि जखमी झायलो कारमधून कल्याणहून कोळगाव येथे जात होते.दौंडजवळ त्यांची कार आणि ट्रक यांच्यात धडक झाली.
अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमींपैकी काहींना दौंड येथे तर, काहींना श्रीगोंदा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Discussion about this post