व्हीएसआरएस मराठी न्युज –शहरातील सामाजिक व पुरोगामी चळवळी चे नेते, राज्यभर असलेल्या सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भिमरत्न प्रा. बी.बी. शिंदे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलासभाऊ कदम यांच्या उपस्थतीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी त्यांच्या समवेत प्रामुख्याने हरिश्चंद्र शिंदे,लक्ष्मण शिरसाठ, विठ्ठल लांडगे, सीताराम बनसोडे व प्रकाश वाव्हळे आदींचा समावेश होता.
काँग्रेस पक्षाचे उपरणे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,
“शहरात काँग्रेस पक्षाला बहुजनवादी चळवळी तील नेत्यांची वाढती पसंती व काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता हे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे यश आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित पणे आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश प्राप्त होईल सामान्य नागरिक, गरीब, कष्टकरी, झोपडपट्टी धारक, बहुजन समाज व चळवळीतील कार्यकर्ते यांचा पूर्ण पाठिंबा काँग्रेसला प्राप्त होत आहे”
काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे झालेल्या या प्रवेश कार्यक्रमास शहर काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पुणे जिल्हा एस.सी. विभागाचे अध्यक्ष राहुल ओव्हाळ, चिंचवड ब्लॉक काँग्रेस चे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, हरीश डोळस, हिरा जाधव, विजय ओव्हाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post