व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.१० आज आळंदीत विजेच्या कडकडाटा सह,मेघ गर्जनेत मान्सून चे सायंकाळी चार वाजता आगमन झाले.या पावसामुळे शहरात व आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली.काही लहान मुले या पावसाचा आनंद घेत पावसात भिजताना दिसली.पाऊस व मोठया प्रमाणात वारे हे दोन्ही एकत्र असल्याने शहरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.भिज पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ही समाधान व्यक्त केले आहे. पेरणीपूर्वी च्या कामाला सध्या वेग येणार आहे.
आज लग्नसराई चा शुभ मुहूर्त असल्याने आळंदी शहरात भर पावसात ही वाहतूक कोंडी मरकळ रस्त्यावर दिसून आली.अवजड वाहने ही रस्त्यावर
दिसून आली. प्रदिक्षणा रस्त्यावर नो पार्किंग च्या फलका शेजारीच तसेच मरकळ रस्तावर ही दुतर्फा वाहने रस्त्यावर च लावलेली काही प्रमाणात दिसून आली.
Discussion about this post