व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -मोकाट कुत्रे व भटकी जनावरे रस्त्यावर सैरावैरा धावत असल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. ती थेट वाहनांच्या समोर येत असल्याने अपघाताचे प्रसंग ओढवत आहेत. काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यामुळे आकुर्डीत तील टुव्हीलर पलटी होऊन दुखापात झाली आहे.
महापालिका, शहरातील सामाजिक संस्था, श्वानप्रेमी आणि पशुवैद्यकीय विभागाने मात्र यावर कंबर कसणे गरजेचे आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या मोकाट कुत्र्यांमुळे व जनावरांमुळे वाहतूक कोंडी होत असून, छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच, जनावरे नागरिकांच्या दिशेने अंगावर जात असल्याचे दिसत आहे.
विविध भागात जनावरे रस्त्यातच ठिय्या मांडून बसत आहेत. तर, मोकाट कुत्री अचानकच चारचाकी व दुचाकी वाहनांसमोर येत असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन वाहने चालवीत आहेत.
Discussion about this post