व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकादरम्यान असलेले कासारवाडी येथील रेल्वे फाटक रस्ते वाहतुकीसाठी १६ ते २० ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील या रेल्वे फाटकाच्या विभागात आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने पाच दिवसांच्या कालावधीत संध्याकाळी पाचपर्यंत रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी जवळच असलेला रेल्वे भुयारी मार्ग किंवा रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी माध्यमातून बंदच्या कालावधीत वाहतूक करावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हे रेल्वे स्थानक जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्गाच्या तिठ्यावर असून कासारवाडी, भोसरी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख हे भाग या स्थानकाचा वापर करतात.
दरम्यान, या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. लांबच्या पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत नाही. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते.
दरम्यान, पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील या रेल्वे फाटकाच्या विभागात आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने पाच दिवसांच्या कालावधीत संध्याकाळी पाचपर्यंत रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहन चालकांनी जवळच असलेला रेल्वे भुयारी मार्ग किंवा रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी माध्यमातून बंदच्या कालावधीत वाहतूक करावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक…
आपल्याकडे दळणवळणाचे अनेक साधने आहेत. असे असले तरी रस्त्यावरून वाहतूक करण्यास रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. मात्र रेल्वे फाटक बंद असतानाही वाहनधारकांची बंद फाटकातून धोकादायक वाहतूक सुरू आहे.
यात अनेकांचे बळी गेले आहेत. तरी हा प्रकार थांबलेला नाही. याशिवाय जिल्ह्यात असलेल्या मानवरहित रेल्वे क्रासींगही धोक्याचेच ठरत आहे. त्यामुळे याच सामान्य नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे खराब झालेले रेल्वे क्रासींग लवकरात लवकर दुरुस्त घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत असते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन हे धोकादायक रेल्वे क्रासींग दुरुस्त करावे.
Discussion about this post