व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मेहवाल ह्यांच्या सोबत बैठक झाली पेठ क्रमांक २४ भूखंड क्रमांक ८/९ निगडी व्यापारी संघटना ह्यांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी सभा क्रमांक २६० दिनांक २०/१०/२००५ रोजी ठराव क्रमांक मंजूर करून देण्यात आला होता.
त्या नंतर दिनांक १५/२/२००६ रोजी निगडी व्यापारी संघटना ह्यांनी दहा लाख रुपये रक्कम पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांच्या कडे जमा केली होती तो भूखंड परस्पर बिल्डर ह्यांना विक्री करण्यात आला त्या संदर्भात आज सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती बैठक मध्ये निगडी व्यापारी संघटना ह्यांच्या वतीने सचिन भाऊ काळभोर बाळासाहेब हिदळेकर राजू बाबर ,सचिन शिंदे , सारीका विवेक चव्हाण ,अनिकेत काळभोर, बंडू काळभोर, राजू काळभोर तसेच इतर व्यापारी ह्याची बैठक संपन्न झाली असून एक महिन्यात सदर निगडी व्यापारी संघटना ह्यांना भूखंड देण्यात येणार असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मेहवाल ह्यांनी हमी दिली आहे.
त्यामुळे ठिय्या आंदोलन आज निषेध म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी कार्यालय ह्या ठिकाणी करण्यात येणार होते ते रद्द करण्यात आले असून पुढिल बैठकीत निगडी व्यापारी संघटना ह्याची बैठक घेण्यात येणार आहे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी सांगितले .
Discussion about this post