व्हीएसआरएस मराठी न्युज –सोमवारपासून संसदेचे विशेष अधिवेशन चालू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते नवीन संसदेच्या गेटवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद चौधरी हे उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले की, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारत युगाच्या बदलाचा साक्षीदार आहे. जग भारताची शक्ती आणि योगदान पूर्णपणे ओळखत आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे आपण विकास, यश पाहत आहोत.”
Discussion about this post