व्हीएसआरएस मराठी न्युज –आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि. १७ सप्टेंबर ) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. टॉस जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्याने चौथ्या षटकात ४ विकेट्स घेतल्या. पथूम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजया डी सिल्वा हे फॉर्मात असलेले फलंदाज माघारी परतल्याने श्रीलंकनच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. वन डे क्रिकेटमध्ये एकाच षटकात ४ विकेट्स घेणारा सिराज हा पहिलाच भारतीय ठरला. त्यानंतर त्याने कर्णधार दासून शनाकाचा त्रिफळा उडवून श्रीलंकेची अवस्था ६ बाद १२ धावा अशी केविलवाणी केली. १०व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर कुसल मेंडिसला स्लीपमध्ये झेल टाकला. पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटला वाटलं लोकेश राहुल झेल घेईल अन् लोकेशला वाटलं विराट… या गडबडीत झेल कुणीच घेतला नाही.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येत ६ विकेट्स गेल्याची ही तिसरी निचांक कामगिरी ठरली. कॅनडाचा संघ २०१३ मध्ये नेट किंग सिटीविरुद्ध ६-१०असा, कॅनडाचाच संघ २००३मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६-१२ असा गडगडला होता. कर्णधार रोहित शर्माने सिराजला गोलंदाजीला कायम ठेवले अन् त्याने १२व्या षटकात कुसल मेंडिसचा ( १७) त्रिफळा उडवून श्रीलंकेची अवस्था ७ बाद ३३ अशी केली. २००२ नंतर वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्या १० षटकांत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम सिराजने नावावर केला. २००३ मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना
Discussion about this post