व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. ‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी दहा दिवसात कोट्यवधींचं दान जमा केलं आहे.
दहा दिवसात ‘लालबागचा राजा’च्या चरणी पाच कोटीचे दान जमा झालं आहे
दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळातर्फे दिली जाते. राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकांमध्येही कुतूहल पाहायला मिळतं. सोने, चांदी, रोख रक्कम याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या जातात. लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या दानाची मोजदाद मंडळाकडून करण्यात आली. दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचं दान आलं आहे. तर साडेतीन किलो सोनं आणि 64 किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे.
लालबागच्याजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. जवळपास एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोना चांदीचे मोदक, चांदीचा मूषक राज, चांदीचे नारळ, चांदीचे ताट, विविध पूजेची सामग्री, चांदीचे छत, चांदीचा कळस, सोन्या चांदीची नाणी, सोनेरी गुलाबाचा हार, चांदीची पंक्ती, छोटे मोठे चांदीचे गणपती, सीजन क्रिकेट बॅट ,सोन्याचा मुलामा दिलेला चांदीच मुकूट भक्तांनी अर्पण करण्यात आले आहे. तसेच या वर्षी इलेक्ट्रीक बाईक आकर्षणाचा विषय ठरली आहे. राजाला चक्क एका भक्ताने इलेक्ट्रिक बाईक दान केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तू घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. राजाच्या मंडपात दर्शनासाठी यंदा तुफान गर्दी होती.
Discussion about this post