व्हीएसआरएस मराठी न्युज -5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.
चेन्नईत भारताचा पहिला सामना –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे.
Discussion about this post