- व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याला आरोपींनी लहानपणीच दत्तक घेतले होते. त्यांनी फिर्यादीला केवळ सातवीपर्यंत शिकवून आपल्या दुकानात कामाला ठेवले. तो ते दुकान लहानपणापासून सांभाळत होता. दुकानात आलेले पैसे तो वडिलांकडे देत होता.
असे असतांना देखील त्याचे आई वडील आणि नातेवाईक तो दत्तक असल्याने त्याला मानसिक त्रास देत होते. त्यांचे आई वडील त्याला रोज शिवीगाळ करत होते. तो घरच्या आणि कामाच्या जबादऱ्या पार पाडत असतांनाही त्याला आई वडिलांकडून वारंवार घराबाहेर काढण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्याचा रोज छळ केला जात होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्राशन केले.
दत्तक मुलाकडून दुकानात काम करून घेत, त्याला सतत टोमने मारून बोलत मानसिक त्रास देणे. तसेच त्याचे शिक्षण देखील अर्धवट ठेऊन घरातून हकलून देण्याची धमकी देत मानसिक त्रास देण्यात आला.
हा त्रास सहन न झाल्याने एका मुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.११) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरीतील सलून सिझर ॲन्ड रेझर या दुकानात घडली.
या प्रकरणी हिदायत अन्वर शेख (वय २९, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१२) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे आई-वडिल, एक महिला आणि एका नातेवाईकावर गुन्हा दाखल केला आहे.
वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्राशन केले. फिर्यादीवर दवाखान्यात उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
Discussion about this post