व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –गायी, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीन औषधाचा वापर करणार्या पुणे, पिंपरीतील सहा गोठामालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-1 ने अटक केली.
विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (झिंजुर्डेमळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (वय 35, रा. आळंदी रस्ता, मोशी), विलास महादेव मुरकुटे (वय 57, रा. मारुंजी, ता. मुळशी), सुनील खंडप्पा मलकुनाईक (वय 51, रा. टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (वय 50, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), महादू नामदेव परांडे (वय 51, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गोठामालक गायी, म्हशींच्या दूधवाढीसाठी ऑक्सिटोसीन ओैषधाचा वापर करीत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला तपासात मिळाली होती. त्यानंतर गोठामालक झिंजुर्डे, सस्ते, मुरकुटे, मलकुनाईक, पैलवान, परांडे यांना अटक करण्यात आली. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण उत्तेकर, मारुती पारधी यांनी ही कारवाई केली.
Discussion about this post