व्हीएसआरएस मराठी न्युज -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत 357 मतदान केंद्रावर एकूण 60.09 टक्के मतदान झाले.
त्यामध्ये भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव रिंगणात होत्या. दोन्ही पक्षांकडून मागील 15 दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. अनेक दिग्गज नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आले होते. आज चुरशीने 60.09 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतदारराजा कोणाला कौल देणार हे येत्या 16 एप्रिल रोजी समजणार आहे.
Discussion about this post