व्हीएसआरएस मराठी न्युज –बोपोडी येथील मेट्रो स्टेशनच्या कामासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला असून 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत हा बदल असणार आहे. या काळात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा बदल असेल.
या काळात पुण्याकडून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने येणारी वाहतूक चर्च चौकातून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून नियमित सुरू राहील.
बोपोडी येथील मेट्रो स्टेशनच्या कामासाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बोपोडी मेट्रो स्टेशनच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खडकी वाहतूक विभागांतर्गत हा बदल करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा बदल असेल.
या काळात जुना पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी-चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहने बोपोडी चौकातून डावीकडे वळण घेऊन खडकी बाजार, एमएसईबी चौकातून उजवीकडे वळून चर्च चौकातून पुढे जातील. तर, पुण्याकडून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने येणारी वाहतूक चर्च चौकातून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून नियमित सुरू राहील.
Discussion about this post