व्हीएसआरएस मराठी न्युज -देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, तुकोबांच्या मूर्तीच लोकार्पण होणार आहे.
त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने उद्या सकाळी ८ ते १४ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.
देहूतील शिळा मंदिर, मूर्तीचा लोकार्पण होताच देहूपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, वारकरी, नागरिक उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post