व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देताना नागरी सहभाग देखील या प्रक्रीयेमध्ये असावा याकरीता महापालिका विविध संवाद माध्यमांचा प्रभावी वापर प्रशासकीय कामकाजात करीत आहे.
जलदगतीने माहितीचा प्रसार आणि नागरी संवाद साधण्यासाठी आता महापालिकेचे सर्व विभाग ई-मेल बरोबरच ट्विटरचा वापर देखील करणार आहेत.
नागरिकांसमवेत सोहार्दपूर्ण नाते निर्माण करण्यासाठी ट्विटर सारखे जलद द्विसंवादी माध्यम प्रभावी ठरणार असून महापालिकेची सकारात्मक प्रतिमा उंचाविण्यासाठी ट्विटर उपयुक्त ठरेल. नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाशी संवाद साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, महापालिकेने नागरिकांकरीता व्हॉटस्ा् अॅप-चॅट बॉट प्रणालीचा वापर सुरु केला आहे. या प्रणालीवर दैनंदिन १०० पेक्षा अधिक व्यक्ती संवाद साधून आपल्या सूचना, तक्रारी आणि म्हणणे मांडतात. यामुळे प्रशासन गतीमान होण्यास मदत होत आहे. आता महापालिकेच्या सर्व विभागांचे स्वतंत्र ट्विटर अकाऊंट असणार आहे. त्यामुळे त्या विभागातील नागरिकांशी संबंधित बाबी ट्विट करुन नागरिकांना त्याबद्दल अवगत केले जाणार आहे. नागरिकांना या माध्यमातून प्रतिसाद देणारे प्रशासन म्हणून महापालिकेची ओळख होणार आहे. या माध्यमाचा उपयोग विभागप्रमुखांनी केल्यास नागरिकांच्या अडचणी, शंका यांचे निरसन जलद गतीने होऊन नागरिकांनी त्वरीत सेवा मिळू शकेल.
शिवाय महापालिकेच्या फॉलोअर्समध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी व्यक्तिश: लक्ष घालून संवाद साधावा असे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांंना दिले. ट्विटर हे संवादाचे पुढचे पाऊल असून नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे, आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
Discussion about this post