व्हीएसआरएस मराठी न्युज –वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे स्वीकारत असल्याच्या संशयावरून वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बुधवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली.
बाळू दादा येडे आणि गौरव रमेश उभे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे कर्मचारी स्वारगेट वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत.
Discussion about this post