व्हीएसआरएस मराठी न्युज -माळशेज घाटातील रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे कॉक्रिटिकरण सुरू करण्यात आले आहे. घाटात पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील १० किलोमीटर अंतरावर हे कॉक्रिटिकरण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
त्यामुळे येत्या १९ मे पासून दर गुरूवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घाटात दगड फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे माळशेज घाटातून (Malshej Ghat) प्रवास करत असताना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मात्र, या पर्यायाने अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी राहणार आहे.
असा असेल पर्यायी मार्ग…
कल्याणवरून येताना खुबी-करंजाळे-खिरेश्वर ते कोल्हेवाही-सागनोरी-पिंपळगाव जोगा-भोईरवाडी-कोळवाडी-ओतुर-आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी वाहतूक व्यवस्था राहणार आहे. वाहनधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाकडून देण्यात आल्या आहेत.
Discussion about this post