व्हीएसआरएस मराठी न्युज –नेपाळ येथील शिष्ठमंडळाने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस भेट दिली.आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले आणि विकास कामांबाबत शिष्ठमंडळास माहिती दिली. त्यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या.
शिष्ठमंडळाचे स्वागत करताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वास्तू विशारद आणि शहरी प्रकल्प सल्लागार तथा बायसिकेल मेयर आशिक जैन, आय. टी. डी.पी चे उप व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी उपस्थित होते.
या शिष्टमंडळात नेपाळचे माजी पर्यटन मंत्री यमलाल कांडेल, बिरेंद्रनगर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निळकंठ खनाल, प्रशासकीय विभाग प्रमुख प्रकाश टंक लमिच्छ्ने, प्रकल्प व्यवस्थापक प्रतिष्ठा कांडेल, प्रकल्प अधिकारी अलिशा कारकी यांचा समावेश होता.
Discussion about this post