व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी (प्रतिनिधी) पिंपळे सौदागर येथील पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त वतीने भाऊबीजेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळ- सूरमयी पहाटच्या सुरांचा आनंद घेत रसिकांनी घेतला फराळाचा आस्वाद.
सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ केला.
यावेळी माजी आमदार विलास लांडे,माजी नगरसेवक शतृघ्न काटे, माजी नगरसेवक मनोहर पवार, कामगारनेते अरुण बोऱ्हाडे,उद्योजक वसंत काटे, प्रा वसंत चाबूकस्वार, हभप शेखर कुटे,पीके स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे,डॉ अमरसिंह निकम, संजय भिसे पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पृथ्वीराज थिएटर्स चे सतीश इंगळे, वंडरबॉय पृथ्वीराज इंगळे, मौतुषी दास, अजिंक्य देशपांडे, ऋतुजा नवगिरे यांनी सादर केलेल्या मराठी हिंदी गाण्याला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.
यावेळी सुमारे सातशे नागरीकांनी फराळाचा आस्वाद घेतला. पिं-चिं. कल्चरल फौंडेशनच्या तीन वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
*मा आमदार विलास लांडे यांच्या गायकीला दाद*
रसिकांच्या आग्रहाखातर विलास लांडे यांनी
“तुम मुझे यु भुला ना पाओगे जब कभी भी सूनोगे गीत मेरे…” हे गाणे सादर करून वन्स मोअर मिळवले. श्री लांडे म्हणाले कि, पक्ष बाजूला ठेवून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विजय भिसेंच्या निमंत्रणाचा मान ठेवून आलो.शहराचे सांस्कृतिकपण जपणे गरजेचे आहे.विधायक कार्यासाठी आम्ही एकत्र येतो.विचारांची भूमिका चांगली असावी लागते.
यावेळी माजी नगरसेवक काटे म्हणाले कि, या लिनिअर अर्बन गार्डन मधील ठिकाणास स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सांस्कृतिक कट्टा असे नामकरण केले जाईल.हे ठिकाण सांस्कृतिक कार्यक्रमास उपलब्ध केले जाईल.
यावेळी विजय भिसे म्हणाले कि, लिनिअर गार्डनच्या या स्थळावर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमास उपलब्ध करून द्यावेत, यासाठी सतत पाठपुरावा करीत होतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय भिसे यांनी तर सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले.
Discussion about this post