व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी ४ नंबर शाळे समोरील मैदानात त्रयस्थ व्यक्तींनी मोठया प्रमाणात मातीचे ढीग आणून टाकले होते त्याबाबत वृत्त वृत्तपत्र प्रसारित झाले होते.
त्याची दखल घेत शाळेतील मैदानावरील बरेचसे मातीचे ढिगारे जीसीपी व ट्रॅक्टर ,डंपर द्वारे उचलून दुसरीकडे हलवण्यात आले आहे.
सध्या मुलांना हे मैदान खेळण्यासाठी मोकळे झाले आहे.काल सकाळी व संध्याकाळी मोठया प्रमाणात मुले या मैदानावर खेळताना दिसली.खेळायला परत मोकळे मैदान निर्माण झाल्याने मुले ही खुश आहेत.
Discussion about this post