व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी तीर्थक्षेत्र विकास कामाअंतर्गत आळंदी येथे आरक्षण क्र.०६ वडगांव रोड येथे वाहनतळ बांधण्यात आले आहे.सुमारे त्र्याऐंशीलाख एकोणचाळीस हजार रुपये खर्च करून हे वाहनतळ बांधले आहे.
मे.मंजुळाई कन्स्ट्रक्शन कंपनी,मोई या ठेक्केदारा मार्फत या वाहनतळाचे काम झाल्याची माहिती तेथील लावलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन विभागाच्या फलकावरून कळते. पालिका प्रशासनाचे या वाहनतळा कडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. वडगांव रस्त्यावर भरपूर मंगल कार्यालय असून त्यात अनेक लग्न कार्य ,समारंभ इ. कार्यक्रम पार पडत असतात.काही कार्यालयांमध्ये गर्दी होत असते. परंतु त्यांच्या कडे वाहन पार्किंग साठी पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने येणारी वऱ्हाड मंडळी येथील रस्त्यावरच चारचाकी,दुचाकी वाहने लावत असतात.तसेच अनेक भाविक दर्शनासाठी दूरवरून आलेले असतात.
त्यांची राहण्याची सोय व इतर सुविधा व्हावी यासाठी येथील कार्यालय ,धर्मशाळेचा आसरा ते घेतात.परंतु मोठ्या वाहनांकरता काही धर्मशाळा, कार्यालयांमध्ये पुरेसी पार्किंग ची सोय नसल्याने ही मोठी वाहने रस्त्यावर च लागतात. त्यामुळे या वाहनांचा रस्त्यावरच्या रहदारीस अडथळा निर्माण होऊन ,वाहतूक कोंडी काही वेळेस होत असते.लाखो रुपयांचा खर्च करून ही येथील वाहनतळ नागरिकांसाठी वाहने लावण्यासाठी अजून ही उपलब्ध नाही.सध्या वाहनतळाच्या जागेत मुले क्रिकेट खेळतानाचे चित्र दिसत आहे.जर वाहनतळ वापरण्याकरिता काही समस्या (हस्तांतरण इ.)असतील तर त्या तत्काळ सोडवून
हे वाहनतळ वाहने पार्किंग साठी खुले केले तर या रस्त्यावर लागणारी वाहने बरीचशी कमी होतील.अशी गावातील नागरिकांची चर्चा होत असते.जर पालिकेने हे वाहनतळ पार्किंगसाठी उपलब्ध केले व वाहनतळावर आलेल्या वाहनांपासून काही सेवा शुल्क आकारले तर पालिकेच्या उत्पन्नात ही नक्कीच वाढ होईल.
Discussion about this post