व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
महापालिकेत 139 सदस्य संख्या असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल. 114 जागांमधून सर्वसाधारणसाठी 76 जागा ठेवून ओबीसींसाठी 38 जागा राहतील. यातील निम्या जागा महिला आणि निम्या जागा पुरुषांसाठी राहतील. पुन्हा महिलांचे आरक्षण काढले जाईल. त्यामुळे खुल्या गटातील घटलेल्या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची तारेवरची कसरत होणार आहे.
26 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.
29 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यास सोडत काढण्यात येणार आहे.
30 जुलैला आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर 30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात येईल.
5 ऑगस्टला आरक्षण निश्चित प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.
Discussion about this post