व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी, कर्मचारी एकाच विभागात ठाण मांडून बसतात. त्यातून प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यास अडचण होत असते.
जुलै महिना उजाडताच महापालिकेत बदल्यांचे, खांदे पालटाचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी सहाय्यक आयुक्त, स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता आरोग्य विभागातील मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अशा 61 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी दि. 25 जुलै रोजी रूजू व्हावे, असा आदेश आयुक्त पाटील यांनी दिला आहे.
आरोग्य विभागातील मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अशा 61 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.
Discussion about this post