व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जल शुद्धीकरण केंद्रात देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून यामुळे पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डमध्ये गुरुवारी (दि २१) पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. हे पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जल शुद्धीकरण केंद्रामार्फत वितरित केले जाते. या केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने गुरुवारी पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे.
या भागात राहणार पाणी पुरवठा बंद
पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सी.एम.ई, आर ॲन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल. कॅन्टोनमेंन्ट बोर्ड, ओ.एप.डी.आर. या भागात गुरुवारी (दि.२१) पाणी पूरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी आठ ते रात्री ११ या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. २२) पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
संपूर्ण पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद
पुण्यात पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध भागात जलवाहिनी तसेच विद्युतीकरणाचे आणि तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येणार आहे. पर्वती टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, वारजे माळवाडी व रामनगर परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर येथील विद्युत/पंपींग येथे ही कामे केली जाणार असल्याने गुरुवारी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि २२) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
Discussion about this post