Breaking News : पिंपरी : मोशी-देहू रस्त्यावरील भंगार प्लास्टिकच्या गोदामाला आज दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. कंपनीला लागून असलेल्या रस्त्यावर साचलेला कचरा जाळल्याने ही आग लागली. त्याची ठिणगी प्लास्टिकच्या गोदामात पडली. हळूहळू आग भीषण होत गेली. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण करून कंपनीच्या गोदामाला वेढले.
नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या दाखल झाल्या. ही आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लाखोंच्या घरात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
Discussion about this post