व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पवना नदीवरील रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राची देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. १३) केले जाणार आहे. त्यामुळे, गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी सकाळी अनियमित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
थेरगाव, काळेवाडी, विजयनगर, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, विशालनगर, पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, जिल्हा रुग्णालय सांगवी, बालेवाडी स्टेडीयम, निगडी, प्राधिकरण सेक्टर २१ ते २८, आकुर्डी, खंडोबा माळ, मोहननगर, रामनगर, संभाजीनगर, शाहूनगर, कृष्णानगर, इंद्रायणीनगर, पांजरपोळ, सेक्टर १२, | बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, जाधववाडी, कुदळवाडी, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, नेवाळे वस्ती, हरगुळे वस्ती, पवार वस्ती, रुपीनगर, चिखली आदी भागातील गुरवारी | सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
Discussion about this post