व्हीएसआरएस मराठी न्युज –रावेत येथे विद्युत विषयक अत्यावश्यक ए.बी.टी मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले.
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीज पुरवठा विभागाची तातडीने विद्युतविषयक कामे करायची असल्याने पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल याची नोंद घ्यावी.
ए.बी.टी मीटर बसविण्यासाठी रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत रावेत येथील जलउपसा बंद राहणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे.
महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सह शहर अभियंता श्रीकांस सवणे यांनी केले आहे.
Discussion about this post