व्हीएसआरएस मराठी न्युज – लोणावळा येथे द फर्न या हॉटेलमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती, सदर कार्यशाळेचे नियोजन करणाऱ्या विभागाने वाहन चालक या सरकारी नामनिर्देशित केलेल्या पदा या ऐवजी ड्रायव्हर हे पद लावून नियोजित केलेल्या हॉटेलच्या स्टाफ रूम मध्ये वाहन चालकांच्या जेवणाची व नाश्त्याची सोय केलेली होती, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चहा, नाष्ट व जेवणार 2 हजार 400 रुपये याप्रमाणे 70 जणांसाठी 1 लाख 98 हजार 240 रुपये खर्च इतका असुन काय कामाचे….
ती सोय तेथे उपस्थित असलेल्या वाहन चालकांनी अनुभवलेली आहे ,ती कोणत्या दर्जाची होती आपले वाहनचालक हे जे सरकारी कर्मचारी आहेत, तसेच जे अधिकारी व कर्मचारी सदर कार्यशाळेला उपस्थित होते, त्यांची सोय कोणत्या ऊच्च दर्जाची करण्यात आलेली होती, ते देखील सरकारी कर्मचारी आहेत व माननीय आयुक्त, माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय प्रभाग अधिकारी, तसेच इतर अनेक अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळे बाबतीची नियोजन व्यवस्था कशाप्रकारची करण्यात आलेली होती,
याबाबत वाहनचालक संघटना अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, व इतर पदाधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त व अतिरिक्त आयुक्त तसेच या कार्यशाळेचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्याला तक्रार करणे गरजेचे आहे, याबाबत वाहन चालक संघटना म्हणून व तसेच इतर पदाधिकारी काय निर्णय किंवा लवकरात लवकर काय उपाय योजना करणार आहेत, हे सर्व वांहचालक बंधूंना कळावे..!!
अशी दुय्यम दर्जाची वागणूक भविष्यात वाहन चालक बंधूंना मिळू नये अशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती, याबाबत तुम्ही संघटना म्हणून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, कळावे तुमचा एक सहकारी कर्मचारी..!! अशी भावना व्यक्त होत आहे.
Discussion about this post