व्हीएसआरएस मराठी न्युज -शिवसेनेचे गटनेते कोण एकनाथ शिंदे की अजय चौधरी यावर २० जुलै रोजी निर्णय होणार आहे.
शिवाय शिवसेनेचे अधिकृत प्रतोद सुनील प्रभू की भरत गोगावले, सभागृहामध्ये कोणाला व्हीप लागू होईल, तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, १६ आमदारांना उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस वैध की अवैध, त्यांच्यावर कारवाई होणार का, ठाकरेंसोबतच्या आमदारांचं काय होणार, शिंदे गट हीच खरी शिवसेना असेल की वेगळ्या गटात विलीन व्हावं लागेल, असे अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे गटाच्या आमदारांची आज दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये ही बैठक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात २० जुलैला शिवसेनेच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्या विषयी ही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. तर दुसरीकडे विधान भवनात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांच्या दालनात ठाकरे गटाची बैठक होत आहे. भास्कर जाधव, अजय चौधरी हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत.
Discussion about this post