व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे :’इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स, पेटंट्स अँड डिझाईन फायलिंग’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आली. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट( नागपूर)तसेच आय पी आर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
भारत सरकारचे असिस्टंट कंट्रोलर ऑफ पेटंट्स अँड डिझाईन्स डॉ. भरत सूर्यवंशी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहनी अध्यक्षस्थानी होत्या.महाविद्यालयाच्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता जाधव यांनी संयोजन केले. डॉ प्रियांका पायगुडे यांनी आभार मानले .
उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील 216 जणांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘नव संकल्पनांमुळे जग अधिक सुरक्षित आणि सुकर होत आहे. अशावेळी बौद्धिक स्वामित्व हक्क पेटंट आणि डिझाईन सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे ठरते.अगदी छोट्या वाटणाऱ्या नवसंकल्पनादेखील औद्योगिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जगाला कलाटणी देतात. त्यामुळे त्याचे हक्क राखून ठेवणे महत्त्वाचे ठरते ‘, असे प्रतिपादन डॉ .भरत सूर्यवंशी यांनी केले.
Discussion about this post