व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहरातून तीन नद्या वाहतात. या नद्यांच्या धरण प्रवणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास अथवा धरण पूर्ण भरल्यास आणि पावसाची संततधार कायम राहिल्यास शहरात पूरपरिस्थिती उद्भवू शकते.
अशा वेळी महापालिकेचे सर्व विभाग सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे गरजचे आहे. साहाय्य करणार्या इतर संबंधित यंत्रणांसमवेतचा संपर्क आणि समन्वयदेखील प्रभावी असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अद्ययावतीकरणासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे,’ असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पॅलेडियम’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेतील सर्व विभागांचे विभागप्रमुख, संबंधित अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासाठी कासारवाडी येथे ‘हॉटेल कलासागर’ येथे पूरआपत्ती व्यवस्थापन टेबलटॉप या संवादात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नल विश्वास सुपनेकर, ‘पॅलेडियम’ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन बालाजी चौहान आणि आदिती घोष यांनी उपस्थित अधिकार्यांना संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्तीविषयक मार्गदर्शन केले.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहायुक्त आशादेवी दुरुगुडे यांच्यासह सर्व सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता, प्रशासन अधिकारी, साहाय्यक आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो किंवा कसे सामोरे जातो, यावर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
Discussion about this post