व्हीएसआरएस मराठी न्युज –भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दंड थोपटून उभ्या ठाकलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरूवारी मोठा निर्णय घेतला. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिंह यांचे निकटवर्तीय निवडून आल्याने साक्षीने कुस्तीला रामराम ठोकला.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी गुरूवारी संजय सिंह यांची निवड झाली आहे. त्यांनी कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेत्या अनिता शेरॉन यांचा पराभव केला. संजय सिंग यांना 47 पैकी 40 मते मिळाली. ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करत दिल्लीत अनेक दिवस आंदोलन केलेल्या कुस्तीपटूंनी शेरॉन यांना पाठिंबा दिला होता.
संजय सिंग हे ब्रिजभूषण यांचे बिझनेस पार्टनर असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण यांच्याच हातात राहणार असल्याची चर्चा आहे. ते महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष होते. या निवडणुकीनंतर साक्षी मलिक व बजरंग पुनिया यांनी पत्रकार परिषदेत घेतली. क्रीडा मंत्रालयाने लैंगिक छळाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांना निवडणुकीत सहभागी होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण पाळण्यात आले नाही, असा आरोप साक्षीने यावेळी केला.
Discussion about this post