व्हीएसआरएस मराठी न्युज –
हिंद केसरी’ किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. पुण्यातील पैलवान अभिजीत कटके यांनी यंदा मैदान मारले असून, हरियाणाचा पैलवान सोमवीर याला पराभूत केले. या विजयानंतर अभिजीत कटके याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले.
अभिजीत कटके याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी शिवसेना (बाळासाहेबांची) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी 2 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे.
हिंद केसरी स्पर्धा भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजली जाते. त्यामुळे यंदाची ‘हिद केसरी’ गदा पुण्याचा पैलवान अभिजीत कटके याने पटकावल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या ‘हिंद केसरी’ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला 4-0 अशा फरकाने पराभूत केले.
याआधी, 2017 सालची महाराष्ट्र केसरीची गदा अभिजीत कटकेने पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. अभिजीत कटकेच्या या विजयानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
Discussion about this post