व्हीएसआरएस मराठी न्युज –
महापालिकेचे व्हॉट्सअॅप आता गतीने आणि परिपूर्णतेन सक्रिय झाल्यामुळे जवळपास १९ विभागांच्या ८० हून अधिक सेवांची माहिती आणि सुविधांचा लाभ नागरिकांना घरबसल्या मिळू लागला आहे.
पुणे महापालिकेच्या विविध १९ विभागांकडून नागरिकांना दिल्या जाणार्या ८० प्रकारच्या सेवा-सुविधा व्हॉट्सअॅप चॅट-बॉटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणारी महापालिका ही देशातील पहिलीच असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत नागरिकांना अनेक सेवा-सुविधांसाठी नागरिकांना महापालिका भवन किंवा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागते. आता मात्र ऑनलाईनमुळे महापालिकेने विविध सेवांची माहिती देणे सुलभ केले आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे; आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, दैनंदिन निगडित गरजांसोबतच तक्रार नोंदणी, विविध प्रकारचे मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलकाची बिले यांचा भरणा करणे, कुत्रा पाळण्याचा परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना, नवीन नळजोडणी अर्ज, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तांतरण, वारसाहक्क हस्तांतरण, तक्रार दाखल व तक्रारीची सद्यःस्थिती पाहणे, ‘शहरी गरीब आरोग्य योजना’, ‘पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना’, ‘पंतप्रधान आवास योजना’, प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, ‘मागासवर्गीय कल्याणकारी योजना’, ‘अपंग कल्याणकारी योजना’, ‘महिला बालकल्याण योजना’, ‘महिला सक्षमीकरण योजना’, ‘युवक कल्याणकारी योजना.’
Discussion about this post