व्हीएसआरएस मराठी न्युज – लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेतून बालकलाकारच्या भूमिकेतून रंगभूमीवर पाऊल टाकणारे ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ८५ वर्षांचे होते. राजा बापट यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘यशोदा’, ‘श्रीमंत’ या नाटकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
Discussion about this post