व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-प्रभाग क्र. १३ निगडी येथील कै. मधुकर पवळे क्रीडांगण लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करण्यात यांवी ,अशी मागणी सचिन चिखले यांनी आयुक्त यांना केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्र. १३ परिसरातील निगडी यमुनानगर मधील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गेली अनेक दिवस फ प्रभाग स्थापत्य यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे या क्रीडांगणाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे.
याच क्रीडांगणामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे, काही ठिकाणी मोडतोड झाली आहे . सुरक्षारक्षक नाही , त्याप्रमाणे भटकी जनावरे व कुत्रे यांचा वावर जास्त त्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी नाराज झालेले आहेत. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की, कै. मधुकर पवळे क्रीडांगणाचा विकास होण्यासाठी सदर क्रीडांगण हे लवकरात लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करावा. अन्याथा जनआदोलन घेतले जाईल.
Discussion about this post