व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापालिकेचे रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रात अचानक ‘वॉल्व’ नादुरस्त झाल्याने विद्युत पंप आणि उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे.
त्यामुळे आज संध्याकाळचा आणि मंगळवारी सकाळचा भोसरी, दिघी, बोपखेल, चऱ्होली, मोशी, बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, चिंचवड, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, दापोडी, सांगवी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले.