व्हीएसआरएस मराठी न्युज -भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या कोअर समितीची बैठक राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश निवडणूक प्रमुख मा.सुनीलजी कर्जतकर, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे व विभाग कार्यालय प्रमुख योगेश बाचल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी पिंपरी चिंचवड जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा व दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली आणि बूथ सक्षमीकरण, आगामी निवडणुका यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना दिल्या व पक्षाच्या अगामी कार्यक्रमांसदर्भात मार्गदर्शन केले. प्रदेश निवडणूक प्रमुख सुनील कर्जतकर यांनी देखिल काही सूचना दिल्या आणि जिल्हाध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले.
Discussion about this post