व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल पुणे पत्रकार श्रमिक संघाच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी,पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षाचा आढावा घेण्यासाठी चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विनयकुमार चोबे यांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विनयकुमार चोबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. पोलीस दलात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हे पदक दिले जाते. सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना चोबे यांनी नागरिकांना,”पोलीस दलाचे डोळे आणि कान म्हणून काम करा”असे आवाहन केले.
Discussion about this post