व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून, येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनास १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री श्री. विखे पाटील यांनी राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दुरदृश्य प्रणालीव्दारे आयुक्त हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post