व्हीएसआरएस मराठी न्युज – माजीआमदार सोपानराव तुकाराम फुगे (वय ८८, रा. भोसरी) यांचे भोसरीत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली असा परिवार आहे.
१९७७ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघातून जनता दलाच्या उमेदवारीवर फुगे निवडून आले होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भोसरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Discussion about this post