व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रधानमंत्री आवास शहरी योजनेंतर्गत भोसरीतील पेठ क्रमांक १२ मधील ७९३ व वाल्हेकरवाडीतील पेठ क्रमांक ३०-३२ मधील ४१४ सदनिकांसाठी अर्ज मागविले होते.
त्यासाठी, एकूण २ हजार ४२३ अर्ज आले होते. त्यापैकी अवघ्या ५७८ जणांनी दहा टक्के रक्कम भरली आहे.
पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक-दुर्बल घटक गटातील अनुसूचित जमातीसाठी २९ व विमुक्त जातीसाठी दोन अशा ३१ सदनिका व अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७९३ सदनिका व पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक-दुर्बल घटक गटासाठी ३६६ सदनिका व अत्यल्प उत्पन्न गटातील ४१४ घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती.
या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला ३ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने १८ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत अखेर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करायचे होते. या प्रकल्पातील घरे डिसेंबर २०२२ पूर्वी ताबा देण्याचे प्राधिकरणाकडून नियोजित केले आहे.
Discussion about this post