व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय संविधानामुळे देश विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. भारतीय संविधानाच्या तत्वांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून घटनेमध्ये असलेल्या कर्तव्यांचे पालन करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय संविधानाप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी पार पाडावी लागते त्यामुळे लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असलेल्या कार्यकारी मंडळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कायदेमंडळ, न्यायपालिका यादेखील लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत, असेही आयुक्त सिंह म्हणाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कुंभार, युवराज दाखले, देवेंद्र तायडे, विशाल जाधव, संतोष शिंदे, मारूती जाकळे, विनोद गायकवाड, गुलाब पन पाटील, बि. टी. शिंदे, अजय शेख, तुकाराम गायकवाड, गणेश भोसले, प्रल्हाद कांबळे, विभागातील वसिम कुरेशी, आदी नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post