व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य हॅलोस्टिक कॅन्सर केअर सेंटरच्या वतीने सर्व पत्रकार बंधू भगिनी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन पाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. यावेळी पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजू वारभुवन, डॉ. देविदास शेलार, बापू गोरे लोकमान्य कॅन्सर रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. निनाद नाईक, डॉ. क्षिरसागर, डॉ. सहदेव गोळे तसेच नंदादीप सेरी आय हॉस्पिटल यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, डोळे तपासणी व विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार यावेळी करण्यात आले.
सहदेव गोळे यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वडघुले आभार कार्याध्यक्ष अविनाश आदक यांनी आभार मानले.
Discussion about this post